पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण तलावात मित्रांसोबत गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल संजय महाजन (वय-१६) रा. अयोध्या नगर जळगाव असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, हर्षल महाजन हा आपल्या आई व वडील यांच्यासह अयोध्यानगरात वास्तव्याला आहे. वडील संजय महाजन हे एमआयडीसीतील बेन्झो केमीकल कंपनीत नोकरीला आहे. तर हर्षल हा नववीचे शिक्षण घेत होता. मंगळवारी ३ मे रोजी सकाळी ९ वाजता संजय महाजन हे कामावर निघून गेले त्यांच्या नंतर हर्षल देखील मित्रांसोबत बाहेर निघून गेला. दरम्यान दुचारी तिन ते चार मित्रांसोबत मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेला. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्याला पाण्यातील खोलीचा अंदाज न असल्याने त्याच बुडाला. तो बुडाल्याचे पाहून किनाऱ्यावर उभे असलेले काही तरूणांनी आरडाओरड केली. याठिकाणी काही पट्‌टीचे पोहणाऱ्यांनी त्याला मयत स्थितीत बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पो.कॉ. साईनाथ मुंढे यांनीघटनास्थळी धाव घेतली व मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केला.

 

घरच्यांना या घटनेची माहिती मिळताच आई, वडील व मित्रांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात धाव घेवून प्रचंड आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content