Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अ. भा. बंजारा शेतकरी सेना पारोळा तालुकाध्यक्षपदी अरविंद जाधव

पारोळा प्रतिनिधी । अ. भा. बंजारा शेतकरी सेना पारोळा तालुका अध्यक्ष पदी तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे स्थायिक असलेले अरविंद जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय बंजारा शेतकरी सेना या सामाजिक संघटनेची जळगाव जिल्हा कार्यकारणी आज संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शाम रोहिदास जाधव यांनी अ भा बंजारा सेना राष्ट्रीय कार्यकारणीच्या सहमतीने जाहीर केली असून तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे स्थायिक असलेले अरविंद जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे.

हि निवड अखिल भारतीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नायक यांच्या उपस्थीतीत पारोळा येथील चैतन्य आश्रमात गुरु श्री दगडूजी महाराज व संघटनेतील इतर सदस्यांन समोर सर्वानुमते करण्यात आलेली आहे. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष अ भा बंजारा सेना कांतिलाल नाईक, काशिनाथ , किसन , विजय जाधव, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यकारणीत गोर बंजारा , धाडी बंजारा व लमाण बंजारा यांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात येणार असून , पुढे कार्यकारणी विस्तार करतांना बंजारा समाजातील इतरही घटकांना यात स्थान देण्यात येणार आहे . या कार्यकारणीत निवड करण्यात आलेल्या प्रत्येक पदाधिकार्याने आप आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात व राज्यात संघटना वाढीसाठी काम करावे व आपल्या समाजाच्या लोकांच्या अडीअडचणी सोडवाव्यात त्यांना शासकीय व इतर कामात मदत करून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. या कार्यकारणीत निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय कार्यकारणी व इतर सर्व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version