Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात बिअर बार दुकान फोडले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील परमिटरूम व बिअरबार हॉटेल फोडून सुमारे ५४ हजार २२५ रुपयांचा देशी विदेशी दारू आणि रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

 

याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील हॉटेल भगवती परमिटरूम व बियरबार हे दुकान मंगेश देविदास पाटील रा. ओमकार नगर यांच्या मालकीचे आहे. १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मंगेश पाटील यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने परमिटरूम व बिअरबारचे दुकान फोडून दुकानातील देशी-विदेशी दारू रोकड आणि इलेक्ट्रिक सामान असा एकूण ५४ हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार दुसऱ्या दिवशी मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आला. या संदर्भात मंगेश पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन पाटील करीत आहे.

Exit mobile version