Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, एरंडोल येथे भरला आठवडे बाजार

एरंडोल प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आठवडे बाजारावर बंदी आणली असताना रविवारी ह्या आठवडे बाजाराच्या दिवशी एकाच ठिकाणी आठवडे बाजार न भरता वेगवेगळ्या चार ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यांची दुकाने थाटण्यात येऊन चक्क आठवडे बाजार भरला. 

यानिमित्ताने नागरिकांची गर्दी दिसून आली या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वाढण्यास मदत झाली. तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. रविवारी एरंडोल येथे. म्हसावद नाका, बुधवार दरवाजा, रा.ती का बरे विद्यालयाजवळ, व ओम नगरमधील चौकात अशा चार ठिकाणी आठवडे बाजार भरण्यात आला. हा प्रकार चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणारा असल्याचे जाणकारांचे मत आहे. विशेष हे की एरंडोल शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना ने कहर केला असून. कोरोना रुग्णांची संख्या अधिकाधिक वाढत आहे. सर्व शासकीय यंत्रणा त्यासाठी अलर्ट झाल्या असून मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे पालन नियमांसह कोरोनाचे सर्व नियम पाळण्यासाठी यंत्रणांकडून सांगण्यात आले होते.

 

Exit mobile version