Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंतुर्ली खुर्द येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा सर्प दंशाने मृत्यू

पाचोरा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील रहिवाशी गोपाल हारसिंग पाटील (वय – ५२) हे आज दि. २५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतात जात असतांना त्यांना एका विषारी जातीच्या सर्पाने दंश केला. काही कळण्याच्या आत गोपाल पाटील हे बेशुद्ध पडले. त्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक हे करित आहे. गोपाल पाटील यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version