Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विहीरीत पाय घसरल्याने २३ वर्षीय युवकाचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नाचणखेडा शेत शिवारातील विहीरीत पाय घसरून पडल्याने लोहटार येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहटार ता. पाचोरा येथील जयकिरण संतोष पाटील (वय – २३) हा युवक २९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शेतातील पिकांना पाणी भरण्यासाठी गेला होता. दरम्यान जयकिरण हा लघुशंकेसाठी नाचणखेडा शेत शिवारातील विहीरी जवळुन जात असतांना अंधारामुळे अंदाज न आल्याने अचानक जयकिरण याचा पाय घसरून तो विहीरीत पडला. घटनेबाबत ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांच्या मदतीने जयकिरण यास विहीरीतुन बाहेर काढुन तात्काळ पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी जयकिरण यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जयकिरण पाटील याचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ असा परिवार असुन जयकिरण हा अविवाहित होता.

 

Exit mobile version