Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात २० वर्षीय तरूणीचा विनयभंग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या तरुणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका भागात २० वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा दीपक कैलास महाजन याने सोमवार २५ मार्च रोजी दुपारी २ वाजता परिसरात तरुणीचा हात पकडून विनयभंग केला हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने नातेवाईकांना सोबत घेऊन अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी बुधवारी २७ मार्च रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दीपक कैलास महाजन यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहे.

Exit mobile version