Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निमगाव येथे उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने १२ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यु

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील निमगाव येथे यावल भुसावल मार्गावरील पाटील यांच्या शेताजवळच्या रस्त्यावर उस वाहतुक करणाऱ्या भरधाव वेगाने ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यु .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की आनंद रघुनाथ सोनवणे वय १२ वर्ष राहणार निमगाव तालुका यावल येथे आज दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावल हुन भुसावळ मार्ग मुक्ताईनगर येथे उस वाहतुक करणाऱ्या या महेन्द्रा कंपनीच्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९डीएफ २५३५ हे यावल कडुन भुसावळ मार्गाने जात असतांना निमगाव जवळ नयनसिंग खुबसिंग पाटील यांच्या शेताजवळील रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर हे भरधाव वेगाने जात असतांना ट्रॅक्टरच्या मागीत ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली असुन,

याबाबत मयताचे काका किरण फकीरा कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने ट्रॅक्टर चालक सोनु छोटू पारधे राहणार डोडीकर तालुका चाळीसगाव याच्याविरुद्ध अपघातास कारणीभुत म्हणुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी उमेश सानप हे करीत आहे . दरम्यान मयत मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात डॉ प्रशांत जावळे यांनी केले  .

Exit mobile version