प्रांताधिकारी दीपमाला चौरेंना ब्लॅकमेलचा संशय; गुप्तांची महासंचालकांकडे तक्रार

जळगाव प्रतिनिधी । प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ब्लॅकमेल केले जात असून त्यांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे माहिती मागितली आहे. तर, गुप्तांनी याबाबत पोलीस सहासंचालकांकडे तक्रार केली आहे.

याबाबत वृत्त असे की, प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांना गेल्या काही दिवसांपासून ऑडिओ क्लिपद्वारे ब्लॅकमेल केले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांना फोन करून मदत मागितली. चौरे यांनी २२ मे रोजी सायंकाळी ७.२० वाजता गुप्ता यांना मोबाइलद्वारे संपर्क साधून ही माहिती दिली आहे. दरम्यान, यानंतर गुप्ता यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, कुणीतरी व्यक्ती ऑडिओ क्लिप बनवून त्यांना ब्लकमेल करीत आहे. एक प्रांताधिकारी सुरक्षित नाही. सामान्य नागरिक सुरक्षित कसा राहील? या अनुषंगाने प्रांताधिकारी यांना सुरक्षा देण्यात यावी. या प्रकरणात सखोल चौकशी करून कॉल डिटेल्स काढून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गुप्ता यांनी पोलिस महासंचालकांकडे केली आहे.

या संदर्भात दीपमाला चौरे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्याला धमकीचा संशय आल्याने गुप्ता यांच्याकडे मदत मागितल्याचे स्पष्ट केले आहे. ब्लॅकमेलींगचा विषय असता तर आपण थेट पोलिसात तक्रार केली असती असेही त्यांनी नमूद केले आहे.

Protected Content