ठाकरे सरकारच्या समर्थनार्थ चाळीसगावात शिवसेनेचे आंदोलन

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाशी लढा देण्यात महा विकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात समर्थपणे काम करीत आहे. मात्र, भरतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रभर आपले अंगण आपले रणांगण या नावाखाली महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले व सरकार अपयशी असल्याचे नाटक करत निषेध केला याच्या विरोधात महा विकास आघाडी सरकारच्या समर्थनार्थ शिवसेनेने भगवे झेंडे हातात घेऊन आंदोलन केले.

भाजपाने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करून महाराष्ट्रभर च्या योद्ध्यांच्या धैर्याचे व हिमतीने खच्चीकरण करण्याचे पाप केले असून त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक महाराष्ट्रातील पोलीस बांधव, डॉक्टर, नर्सेस, सामाजिक संस्था, पत्रकार हे रात्रंदिवस कोरोनाशी लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सर्व खंबीरपणे काम करीत आहेत. मात्र, या सगळ्यात महाराष्ट्र कोरोनाशी लढण्यात अयशस्वी होत असल्याचा आरोप करून भारतीय जनता पार्टीने त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. महा विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सदैव सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून प्रत्यक्ष रणांगणात युद्ध करून लढण्याचे काम आमचे असून अंगणातले नाटक नाही असेही यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, चाळीसगाव तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालूका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, युवासेना शहर प्रमुख रवींद्र चौधरी, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, रघुनाथ कोळी, बापू लोणकर, प्रभाकर उगले ,रमेश भवर, गणेश भवर, बापू नावडकर, दिनेश विसपुते, निलेश गायके, अण्णा पाटील, प्रदीप पिंगळे, सोमनाथ साळुंखे, संतोष गायकवाड आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Protected Content