शेंदुर्णी येथे शासकीय ज्वारी, मका,बाजरी खरेदी केंद्रास मंजूर

शेंदूर्णी,ता.जामनेर, प्रतिनिधी । शेंदूर्णी सहकारी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटी येथे शासकीय ज्वारी, मका,बाजरी खरेदी केंद्र शासनाने मंजूर केले आहे. तसे पत्रही संस्थेस प्राप्त झाले आहे,यामुळे शेंदूर्णी,पहूर परिसरातील शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेला मका,ज्वारी,बाजरी विकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या चार महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉक डाउन जाहीर करण्यात आला होता. त्याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वानाच बसला आहे. उत्पादन समाधानकारक असूनही व्यापार ठप्प आहे. शासकीय मका खरेदी दर १७०० रुपये असतांना खाजगी व्यापारी ८५० ते ११०० रुपये दराने खरेदी करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसत होता. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाचणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शेंदूर्णी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग संस्थेचे आर्थिक स्त्रोत बंद होते. खरेदी केंद्रांच्या माध्यमातून संस्थेस आर्थिक ऊर्जा देण्याचे कामही होणार आहे. मका खरेदी केंद्रास सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी परवानगी दिली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड, प्रदीप लोढा यांनी केलेल्या पाठपुराव्याने केंद्र मंजूर झालेच्या वतीने संस्थेचे चेअरमन दगडू विष्णू पाटील यांनी राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना शेंदूर्णी येथे शासकीय ज्वारी,बाजरी मका, खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी संचालक मंडळाच्या वतीने पत्र पाठविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील,राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड,माजी जिल्हापरिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या अथक प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश येऊन राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी संस्थेचे चेअरमन दगडू विष्णू पाटील व व्हाईसचेअरमन नंदकिशोर बारी व सर्व संचालक मंडळाने शासनाचे व सर्व नेत्यांचे आजच्या पत्रकार परिषदेत चेअरमन दगडू पाटील यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले आहे.तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी व जामनेर तालुका तहसीलदार यांनी शेंदूर्णी येथील मका खरेदी केंद्रासाठी ग्रेडर व बारदानची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content