दोन महिन्यांनंतर लालपरी पहूर-पाचोरा धावली

पहूर ता.जामनेर, प्रतिनिधी । राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आजपासून जिल्ह्याअंतर्गत सुरू झाल्या. तब्बल दोन महिन्यानंतर लालपरी रस्त्यावर धावतांना दिसली.

पाचोरा आगाराची पहूर-पाचोरा ही बस आज सकाळी १०.४५वाजता पहूर बसस्थानक येथे पोहचली. यावेळी बसचे चालक प्रविण माळी, वाहक गोपाळ गौंड यांचा सत्कार करण्यात येऊन बसचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पहूर पेठचे उपसरपंच शाम सावळे, रामेश्वर पाटील, अँड. संजय पाटील, अरुण घोलप, रवि जाधव,वाहतूक पोलीस जवानसिंग राजपूत, शांताराम लाठे, गणेश पांढरे, बडगुजर सर, रतन सोनार, समा शेख, सेवानिवृत्त नायब तहसीलदार किसन कुंभार, भिका पाटील, दिलीप बावस्कर, शाकिर शेख आदी उपस्थित होते. बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केवळ २२ प्रवासी घेऊन त्याच भाड्याने ही सेवा सुरू झाली आहे. तसेच कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता १०वर्षे खालील व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content