देशभरातील विमानसेवा २५ मेपासून होणार सुरू !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरातील विमानसेवा २५ मेपासून सुरू केली जाणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनामुळे मागील दीड महिन्यांपासून जास्त काळ विमान सेवा बंद आहे.

 

कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्याने केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसह देशातंर्गत विमान वाहतूक सेवा बंद केली होती. दरम्यान, केंद्र सरकारने लॉकडाउनला ३१ मे पर्यंत मुदतवाढ देताना अनेक बाबींमध्ये शिथिलता आणण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे हवाई वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर आज केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी २५ मे पासून अंशकालीन पद्धतीनं देशातंर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यात येईल. २५ मे पासून विमानसेवा सुरू करण्यासाठी सज्ज राहावे, अशी सूचना सर्व विमानतळाच्या प्रशासनाला आणि हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना दिली आहे. प्रवाशांच्या प्रवासांसंदर्भात नियमावली केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून जारी करण्यात येईल,” असेही हरदीप सिंह पुरी यांनी आल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Protected Content