पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्याचे शिखर धवनचे आवाहन

नवी दिल्ली वृत्तसंस्था । करोनामुळे जगाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा क्रीडा जगतालाही मोठा फटका बसला आहे. पण खेळापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे करोनाशी लढण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे आणि देशाला मदत केली पाहिजे, पंतप्रधान सहाय्यक निधीला मदत करावी, असे आवाहनही भारताचा सलामविर शिखर धवनने केले आहे.

२१ दिवस देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक लोक घरात आहेत. त्याचबरोबर करोना बाधितांची संख्याही वाढत आहे. सरकार आणि यंत्रणा यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. पण त्यासाठी त्यांना मदत निधीची गरजही लागू शकते. यासाठी धवनने एक पाऊल पुढे उचलले आहे. धवनने काही रक्कम पंतप्रधान सहाय्यक निधीला दिलेली आहे. त्यामुळे आता देश संकटात असताना लोकांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन धवनने केले आहे.

Protected Content