खामगाव शहरात रिमझीम पाऊस; शेतकरी चिंतेत

खामगाव प्रतिनिधी । खामगाव शहरात आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास रिमझीम पाऊस झाला. दुपारपासून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतपिकांची नुकसान होणार असल्याने परीसरातील शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.

खामगावात सध्या सर्वत्र कोरोना वायरसची प्रादूर्भाव होत असताना नुकताच वातावरणात बदल होत गुढीपाडव्याच्या दिवशी शहरात रिमझिम पावसाची सुरवात झाली आहे. एकंदरीत एकीकडे कोरोनाचे सावट तर दुसरीकडे निसर्गाचे बदलते रूप मार्च महिन्यात देखील पावसाची ढगाळ वातावरण एक चिंतेची बाब होत आहे. एकंदरीत नागरिकांनी यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे 21 दिवसाचे लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय सध्या तरी सर्वत्र नागरिकांसमोर उपलब्ध आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Protected Content