संचारबंदी : यावल येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चोप

यावल, प्रतिनिधी । शहरात आज संचार बंदीचा तिसरा दिवस असून बंदीच्या काळात असंख्य नागरिक कारण नसतांना शहरात फिरून संचारबंदीचे उल्लंघन करतांना दिसत आहेत. याची दखल घेत पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चोप दिला आहे.

यासंदर्भात वृत्त असे की, मागील दोन महिन्यांपासून करोना या घातक विषाणू आजारामुळे अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. या करोना विषाणूच्या अत्यंत घातक आजाराचे प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात व महाराष्ट्र राज्यात जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत. यावल शहरात व तालुक्यात जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून नागरिक शहरात विनाकारण बिनधास्त फिरत असताना दिसून येत आहे. यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी व त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरात आज सकाळी गस्त घालून जमावबंदीचा आदेशाचे पालन न करणाऱ्या व कुठलेही काम नसताना फिरणाऱ्यांना चांगला चोप दिला. आज सकाळपासूनच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह यांनी शहरातील बुरुज चौक ते बोरावल, गवत बाजार गेट, कोर्ट रोड, सुदर्शन चित्र मंदिर, भुसावळ टी पॉइंट, यावल बस स्थानक परिसर या परिसरात गस्त घालून विनाकारण दुचाकी वाहने घेऊन बाहेर फिरणाऱ्याना चांगला चोप दिला व जमाबंदी काळात नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी बाहेर घराबाहेर निघू नये असे आवहान पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे. दरम्यान जमाबंदीच्या काळात परप्रांतातून अवैध मार्गाने येणाऱ्या विमल गुटखा व पानमसाला या पदार्थावर बंदी असताना या मार्गाने दुप्पट भावाने विक्री करण्यात येत आहे तरी अन्न व औषध प्रशासन विभागाने या गंभीर विषयाकडे लक्ष वेधून तात्काळ अवैध मार्गाने गुटक्याची विक्री करणाऱ्यांवरकार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Protected Content