व्हेंटिलेटर,सर्जिकल मास्कची निर्यात, हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट नाही का? ; कॉंग्रेसचा मोदींना सवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सुचनांप्रमाणे भारतात कोरोना नियंत्रणासाठी व्हेंटिलेटर आणि सर्जिकल मास्क पुरेशा प्रमाणात साठवून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी या वस्तूंची निर्यात बंद करण्यास सांगितले आहे. असे असतानाही भारत सरकारने १९ मार्चपर्यंत या सर्व वस्तूंच्या निर्यातीला परवानगी का दिली? हा खेळ कोणत्या शक्तींच्या सांगण्यावरुन खेळला जात आहे? हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट नाही का?, असा सवाल कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारलाय.

 

कोरोनामुळे भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रापाठोपाठ इतर राज्यातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सरकारकडून करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाय केले जात असले, तरी संसर्ग रोखण्यात अपयश येत असल्याचे एकूण चित्र आहे. यासंर्दभात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी फेब्रवारीमध्येच केंद्र सरकरला सावध केले होते. पण, सरकारने त्यांचा सल्ला गांर्भीयाने घेतला नाही. तशात आता राहुल गांधी यांनी आपल्या या ट्विटसोबत शोधपत्रिका करणाऱ्या कारवान या न्यूज पोर्टलचा एक अहवालही जोडला आहे. यात भारत सरकारकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनांच्या उल्लंघनावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

 

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी जगभरातील देशांना काही महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. त्या भारतात मोदी सरकारने का पाळल्या नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. तसेच कुणाच्या सांगण्यावरुन हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचला? असाही प्रश्न राहुल गांधींनी विचारला. त्यांनी ट्विटर करत आपलं मत व्यक्त केलं.

Protected Content