कोरोना : पंजाबमधील सर्व जिल्ह्यात कर्फ्यूची घोषणा !

चंडीगड (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंजाब सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे.

 

पंजबाचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर, चीफ सेक्रेटरी आणि पंजाब पोलिस महासंचाल यांच्यात कोरोना संबंधी उपाययोजना करण्यासाठी बैठक झाली आणि त्यात हा कर्फ्यूचा निर्णय झाला. पंजाब राज्य सरकारने कर्फ्यू लावण्यापूर्वी लॉकडाउन संबंधी दिशा-निर्देश जारी करत कलम-144 लागू केकेले होते. परंतू नागरिक रस्त्यावर मोकाट फिरत होते. रस्त्यावर फिरणाऱ्या गाड्यांना आणि नागरिकांना पाहून पंजाब सरकारने गांभीर्याने विचार करत अखेर सर्व जिल्ह्यात कर्फ्यूची घोषणा केली. दरम्यान, देशात कोरोना व्हायरस संक्रमणच्या आतापर्यंत ४०८ केस आढळून आल्या असून ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे २२ राज्यातील 75 जिल्हे ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन केले आहेत.

Protected Content