कोरोना : शेअर बाजारात मोठी घसरण !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या इफेक्टमुळे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेंसेक्स २३०७ अंकांनी पडले. शेअर बाजार आज २७६०८ अंकावर उघडला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज जवळपास ८०० अंकांनी घसरला. स्टॉक एक्सचेंज ७९४५ अंकावर उघडला.

 

कोरोना व्हायरसच्या भीतीने देशातील शेअर बाजाराची सोमवारची सुरुवात अतिशय वाइट झाली. सुरुवातीच्या अर्ध्या तासातच बाजारात लोअर सर्किट लावावे लागले. बीएसई १० टक्के अर्थात २९९१.85 अंकांनी घसरून २६९२४.११ पर्यंत पोहोचले. तर निफ्टीमध्ये सुद्धा ९.६३ टक्के अर्थात ८४२.४५ पॉइंटची घसरण होऊन निर्देशांक ७९०३ वर येऊन ठेपला. तरीही ४५ मिनिटांच्या लोअर सर्किटनंतर बाजार पुन्हा सुरू झाले आणि ट्रेडिंगमध्ये पुन्हा घसरण दिसून आली. सध्या सेंसेक्स ३४३९.८० पॉइंट कोसळून २६,४७६.१६ वर तर निफ्टी ९८०.२० पॉइंट खाली येऊन ७,७६५.२५ वर ट्रेडिंग करत आहे. दरम्यान, शुक्रवारी सेंसेक्स ५.७५ टक्क्यांनी म्हणजेच १६२७.७३ अंकांनी मजबूत होत २९,९१५.९६ वर बंद झाला होता.

Protected Content