रावेरात दोन गटात तुफान दगडफेक; पोलीसांची घटनास्थळी धाव

रावेर प्रतिनिधी । शहरातील छ.शिवाजी महाराज चौकात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. आज देशभरात कर्फ्यू लागू असतांना घडलेला प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी स्थानिक पोलीसांनी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, संपुर्ण जिल्ह्यात शासनाच्या आदशानुसार कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर संपुर्ण जिल्हातून या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र आज रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रावेर शहरातील शिवाजी चौकात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. दरम्यान आज झालेल्या दगडफेकमुळे प्रचंड प्रमाणावर खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तत्काळ आपल्या पथकासह घटनस्थळी दाखल झाले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Protected Content