क्राईम

FIR
क्राईम जळगाव

लॉकडाऊनच्या काळात हॉटेल सुरू ठेवणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. जमावबंदीत रात्रीची वेळ निश्चित करून दिली आहे. किराणा दुकान व मेडिकल वगळता अन्य आस्थापने बंद आहेत. असे असताना रविवारी रात्री १० वाजता काही हॉटेल सुरू असल्याचा प्रकार जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या पाहणीतून उघडकीस आला. […]

car jalali
क्राईम जळगाव

अज्ञात माथेफिरूंनी पेट्रोल टाकून जाळल्या दोन कार व दुचाकी; संशयित सीसीटीव्हीत कैद (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अज्ञात माथेफिरूंनी मध्यरात्री पेट्रोल टाकून दोन कार व दोन दुचाकी जाळल्याची घटना तीन ठिकाणी घडली. यात एक कार व एक दुचाकी जळून खाक झाली तर उर्वरित दुचाकी आणि कार पेटवून दिल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी रामांनदनगर पोलिसात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहिती […]

Logo News
क्राईम चोपडा

गुळी नदी पात्रात दोन तरूण बुडाले

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वर्डी येथील तीन युवक गुळी नदीत पोहण्यासाठी उतरले असता त्यातील दोघे वाहून गेले असून एक मात्र सुदैवाने बचावला आहे. सध्या गूळ प्रकल्पातून आवर्तन मिळाल्याने गुळी नदीच्या पात्रात पाणी आलेले आहे. दरम्यान, तालुक्यातील वर्डी येथील तीन युवक गुळी नदीत रविवारी सायंकाळी पोहण्यासाठी उतरले. यातील सिद्धार्थ शिवाजी साळुंके […]

images
क्राईम चाळीसगाव

डंपरच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू; पोलिसात गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । भरधाव डंपरने धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाच्या भैरवनाथ मंदिराजवळ ही घटना घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शाकीर अली जाकीर अली (वय २८) आणि शमीम शाह (वय २६) […]

क्राईम राज्य

धक्कादायक : दारूसाठी मोठ्या भावाकडून लहान भाऊचा खून

बीड (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात दारु पिण्यासाठी पैसे न दिले नाही म्हणून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन काळे असे या आरोपीचे नाव आहे.   माजलगाव तालुक्यात राहणाऱ्या आरोपी गजानन हा आपला लहान भाऊ लक्ष्मण काळे याच्याकडे दारुसाठी पैशाची मागणी करत होता. मात्र […]

crime bedya
क्राईम जळगाव

अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्लाप्रकरणातील १२ जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजकमल चौक परिसरात २७ मे रोजी अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करत असतांना ३० ते ३५ फळविक्रेत्यांनी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना आज घडली होती. शनीपेठ पोलीसात फळविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील १२ फळविक्रेत्यांना शनीपेठ पोलिसांनी आज अटक केली आहे. काय आहे […]

ravi Rana1
क्राईम राजकीय राज्य

संचारबंदीत उड्डाणपूलाचे उद्घाटन ; आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध गुन्हा

अमरावती (वृत्तसंस्था) संचारबंदी लागू असताना शासनाची कुठलीही परवानगी न घेता अमरावती शहरातील राजापेठ येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   राजापेठ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. […]

crime 7 1
क्राईम रावेर

मद्यप्राशन करून झन्नामन्ना खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

सावदा प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मस्कावद ते वाघोदा रस्त्यावरील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दारू पिऊन झन्नामन्ना खेळणाऱ्यांचा डाव शनिवारी रात्री सावदा पोलिसांनी उधळला. कारवाईत दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सात जणांवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मस्कावद ते वाघोदा रस्त्यावर […]

wp 15909060341064418035965433668847
क्राईम जामनेर

गोंदेगाव शिवारातील दारू अड्डा उद्ध्वस्त; पहूर पोलिसांची कारवाई

पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी)। जामनेर तालुक्यातील गोंदेगाव शेत शिवारात बेकायदेशीर देशी हातभट्टी पहूर पोलिसांनी उद्ध्वस्त करून दारू व दारू बनविण्याचे रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथील शेत शिवारात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू बनविण्यात असल्याची माहिती पहूर पोलिसांनी मिळाली. […]

wp 15909052055562464162749196976183
क्राईम भुसावळ

फरार आरोपी वर्षभरानंतर भुसावळ पोलीसांच्या जाळयात

भुसावळ प्रतिनिधी । एक वर्षांपासून फरार असलेला आणि दोन वर्षांकरीता हद्दपार केलेला आरोपीला भुसावळ शहर पोलीसांनी अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भाग ५ गुरनं ९६/२०१९ प्रमाणे भादवि १४३, १४४, १४७, ४२७ प्रमाणे संशयित आरोपी मुकेश प्रकाश भालेराव […]