रावेर

wp 15909301961121610270242451758257
रावेर

पाल परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; घरावर झाड कोसळले : नवती केळीचे नुकसान

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील आदिवासी पट्टा असलेल्या पाल परिसरात अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून या वादळी पावसामुळे एका घरावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे त्या घराची कौले तुटून घराची पडझड झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सुत्रांनी कळविले. दरम्यान, या अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली […]

corona spread
आरोग्य रावेर

चिनावलात कोरोनाची एंन्ट्री; प्रौढ रूग्ण पॉझिटीव्ह

सावदा प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील चिनावल गावात एका संशयित रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडालीय. आढळून आलेल्या रूग्णाच्या घराजवळील परिसर सील करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सेंट्रल बँक व सोसायटी समोरील भागात वास्तव्य करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. संबंधित रूग्णाला जिल्हा कोविड […]

raver medical store
आरोग्य रावेर

रावेरात शिवा इव्हेंटतर्फे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधाचे मोफत वाटप

रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शहरातील शिवा इव्हेंटच्या वतीने ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधाचे मोफत वाटप करण्यात येत आहे. आयुष्य मंत्रालयातर्फे प्रमाणित ‘आर्सेनिकम अल्बम-३०’ या औषधीचा रावेर शहरात तुटवडा होत होता, तसेच काही लोक जास्त किंमतीने औषध विकत होते. हे लक्षात घेवून शहरातील शिवा इव्हेन्टचे संचालक गणेश जाधव […]

corona test
आरोग्य रावेर

रावेर तालुक्यात चार बाधीत; एक रूग्ण पुन्हा पॉझिटीव्ह

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील चार रूग्णांचे रिपोर्ट कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून यातील तीन रूग्ण नवीन असून यासोबत उपचार सुरू असणार्‍या एकाचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे. आज रावेर तालुक्यात तब्बल चार जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. यात सावद्यातील दोन तर कुंभारखेडा व गाते प्रत्येकी एक असे एकूण चार […]

corona virus 1
आरोग्य रावेर

सावदा येथील मृत रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सावदा शहरात आज एका मयत रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून याला मुख्याधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. सावदा येथील दोन रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. यात बुधवारा परिसरातील मृत व्यक्तीच्या चाचणीचा समावेश आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर संबंधीत रूग्णाच्या रहिवासाचा परिसर […]

crime 7 1
क्राईम रावेर

मद्यप्राशन करून झन्नामन्ना खेळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

सावदा प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मस्कावद ते वाघोदा रस्त्यावरील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दारू पिऊन झन्नामन्ना खेळणाऱ्यांचा डाव शनिवारी रात्री सावदा पोलिसांनी उधळला. कारवाईत दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सात जणांवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मस्कावद ते वाघोदा रस्त्यावर […]

faizpur ajit thorbole 1
आरोग्य रावेर सामाजिक

प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी केली रावेर कोविड सेंटरची पाहणी

  रावेर, प्रतिनिधी | आज प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी रावेर कोविड सेंटरला भेट देऊन जेवण,स्वच्छता, व इतर सोयी-सुविधांची पाहणी केली. येथे असलेल्या नागरीकांची देखिल त्यांनी संवाद साधला. रावेर तालुक्यात मागिल आठ-दहा दिवसात कोरोना व्हायरसचा स्प्रेड होण्याचा प्रमाण वाढले असून या दरम्यान तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभुमीवर […]

khadse e1550572684596
आरोग्य राजकीय रावेर

प्रशासनामधील समन्वयाच्या अभावाने कोराना रूग्णांमध्ये वाढ- माजी मंत्री खडसे

रावेर (शालिक महाजन) । प्रशासनाचा एकमेकांमध्ये समन्वय नाही, कोरोना संदर्भात योग्य पाऊल उचलले गेले पाहिजे होते, ते उचलले गेली नाही. परिणामी कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय, अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलतांना सांगितले. प्रयोगशाळा नसल्यामुळे कोरोना अहवाल लवकर मिळत नाही, रिपोर्ट येईपर्यंत कोरोनाबाधित रूग्ण […]

busbadlate
रावेर सामाजिक

रावेर आगारातून मालवाहतूकीची सुविधा ; आगार प्रमुख बेंडकुळे

रावेर, प्रतिनिधी । एसटी महामंडळातर्फे प्रवासी वाहतुकीबरोबर आता माल वाहतूकही करण्यात येणार आहे. एस.टी. महामंडळाच्या येथील आगारातून संपूर्ण राज्यात माल वाहतुकीची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आगार प्रमुख बेंडकुळे यांनी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एसटीची प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती. […]

new small logo
आरोग्य रावेर

रावेर येथे नियम न पाळणाऱ्या २९ जणांवर दंडात्मक कारवाई

रावेर, प्रतिनिधी । दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असूनही नागरिक शासनाने सांगितलेले नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. विनाकारण घराबाहेर फिरणे, मास्कचा वापर न करणे तसेच फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करत नसल्याचे दिसून येत असून अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मास्क न वापरणे व डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या २९ नागरिकांकडून […]