चोपडा

bjp 1
चोपडा राजकीय

‘स्थगिती’ सरकार विरोधात उद्या भाजपचे धरणे आंदोलन ; म्हाळके

चोपडा, प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी झुलवत ठेवणारे सरकार आजतागायत काहीही देवू शकलेले नाही.राज्यात महिलांवर होणारे अत्त्याचार दिवसागणिक वाढत आहेत. मात्र ‘तिन तिघाडा’ सरकार मागच्या भाजप सरकारचे जनहिताचे निर्णय केवळ स्थगित करण्याचा उपक्रम राबवीत असल्याने या सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील सर्व तहसिल कचेरींवर भाजप धरणे आंदोलन करणार असल्याचे माजी पं.स.सभापती आत्माराम […]

Chopda new
करियर चोपडा सामाजिक

चोपडा येथील डॉ.प्रा.लोहार यांचे आंतरराष्ट्रीय परीषदेत पुरस्कार देवून सन्मान

चोपडा प्रतिनिधी । चोपडा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रकाश लोहार यांचे मांडू (मध्यप्रदेश) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीत “रिकग्निशन अवार्ड” सन्मानपत्र व सुवर्णपदक देवून करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ, देवी अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, इंदोर आणि आदर्श इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट […]

chopda 3
चोपडा

हिंदूराजे गृपतर्फे महाशिवरात्रीला नेहरू वसतीगृहात फराळ वाटप

चोपडा (प्रतिनिधी) येथील हिंदूराजे गृपतर्फे महाशिवरात्रीच्या महापर्वावर सामाजिक बांधीलकी जोपासत डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात साबुदाणा खिचडी, फळे, वेफर्स आदी फराळाचे पदार्थ वाटप करण्यात आले होते.   हिंदूराजे गृपतर्फे सदोदित शहरात जन सामान्यांच्या मदतीला धावण्यात पुढे असून गृपचे अध्यक्ष महेंद्र भोई गरजू गरजवंतांसाठी सामाजिक […]

jirnoddhar
चोपडा

सोमवारपासून चोपड्याच्या पुरातन श्री बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा

चोपडा प्रतिनिधी । शहराच्या सांस्कृतिक मिरासदारीत भर घालणार्‍या श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या श्री बालाजी मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलदास छगनलाल गुजराथी यांनी दिली. शहराच्या मध्यवर्ती भागात पुरातन गोलमंदिराजवळ श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचे सुमारे चारशे वर्षे पुरातन बालाजी मंदिर अस्तित्वात […]

apatkalin
चोपडा

विवेकानंद विद्यालयात आपत्कालीन जनजागृती

चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.पी. रावळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आपत्कालीन जनजागृतीचे धडे दिले. जिल्हाधिकारी यांच्या आपत्ती व्यवस्थापन जनजागृती प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम २०१९ -२०२० च्या नियोजित मंजूरी आराखड्यानुसार जिल्ह्यातील तालुकानिहाय निवडक शाळांमध्ये शालेय सुरक्षा व आपत्कालीन रंगीत तालीम( मॉकड्रील)या विषयाबाबत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन […]

Jalgaon Zilla Parishad
चोपडा जळगाव राजकीय

उज्ज्वला म्हाळके यांची निवड अवैध ठरवा- निलीमा पाटील

जळगाव प्रतिनिधी । जि.प.च्या कृषी पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला म्हाळके यांची सभापती निवड ही चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने याला अवैध ठरवण्या यावे अशी मागणी प्रा. नीलिमा पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. प्रा. निलीमा पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेत ६ जानेवारी रोजी […]

chopda shivjayanti
चोपडा सामाजिक

स्रियांचा सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नितीतत्व राष्ट्रनिर्मितीस प्रेरक- बाविस्कर

चोपडा प्रतिनिधी । स्रियांचा सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नितीतत्व राष्ट्रनिर्मितीस प्रेरक ठरणारे असल्याचे प्रतिपादन मंगेश बाविस्कर यांनी केले. ते येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविदयालयातील इतिहास विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविदयालयातील इतिहास विभागातर्फे छत्रपती […]

chopda1
चोपडा शिक्षण

चोपडा येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवरायांना अभिवादन

चोपडा प्रतिनिधी । येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने या कार्यक्रमात यशोधन चैरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ राहुल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ राहुल पाटील यांनी महाराजांची प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका परमेश्वरी यांनी […]

chopda
चोपडा शिक्षण

चोपडा महाविद्यालयात करिअरची वाटचाल यावर मार्गदर्शन

चोपडा प्रतिनिधी । कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य व्यवस्थापन विभागातर्फे 18 फेब्रुवारी 2020 या दिवशी करियर गायडन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे वक्ते श्री राजेंद्र डांगी हे उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, डॉ. एन. एस. कोल्हे, विभाग प्रमुख प्रा.सी. आर. देवरे, सहा. प्रा. ए. […]

chopda 2
चोपडा शिक्षण

चोपडा महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी । येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने १७ फेब्रुवारी २०२० रोजी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सी.ए.ए.), ‘राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ (एन.पी.आर.) व ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (एन.आर.सी.) या विषयावर महाविद्यालयीन स्तरावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डी.डी.कर्दपवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]