राजकीय

yawal 1
यावल राजकीय

यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वेबिनार मिटिंग

  यावल, प्रतिनिधी| येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा यावल नगर परिषदचे नगरसेवक प्रा. मुकेश येवले यांनी काल दि. ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ‘झूम’ या वेबिनार मिटींग आयोजीत केली. त्याला तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी चांगला प्रतिसाद दिला. सध्या आपल्या देशात आणि राज्यात […]

shivsena2
एरंडोल राजकीय सामाजिक

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिर

  एरंडोल, प्रतिनिधी | येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आवाहनानुसार एरंडोल येथे शिवसेनातर्फे जिल्ह्यात पहिले रक्तदान शिबिर घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांचा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा घेण्यात आलेल्या बैठकीत कोरोनाचा महामारीत आठच दिवस रक्तसाठा पुरेल एवढाच शिल्लक […]

devendra marathe
जळगाव राजकीय राज्य शिक्षण

अंतिम वर्षाचे विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण होतील; एनएसयुआयतर्फे निर्णयाचे स्वागत (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अंतिम सत्राच्या परिक्षासंदर्भात महाविकासआघाडी सरकारने निर्णय दिला आहे. विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाईल असा निर्णय मंत्रीमंडळाने रविवारी घोषीत केला. ही मागणी एनएसयुआयने केली होती. त्यास यश आले असून निर्णयाचे एनएसयुआय संघटनेने स्वागत केले आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा रद्दचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, या निर्णयामुळे राज्यातील १० लाख […]

VARSHA GAIKWAD
राजकीय राज्य शिक्षण

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.   शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याच्या अधिनियमानुसार शालेय शिक्षण […]

uddhav thakre latest
राजकीय राज्य

…आता पुनश्‍च हरी ओम ! : उध्दव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनचा बाऊ न करता आता नव्याने आयुष्य सुरू करायचे असल्याचे नमूद करत आता पुनश्‍च हरी ओम करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. आज रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधतांना बोलत होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून […]

sanjay raut 3
आरोग्य राजकीय राज्य राष्ट्रीय

‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) गुजरात, मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचे संक्रमण व्हायला फेब्रुवारी महिन्यात अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.   संजय राऊत यांनी ‘सामना’च्या मुखपत्रात केंद्र सरकारवर देखील टीका केली आहे. राऊत पुढे म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या […]

dharangaon 3
आरोग्य धरणगाव राजकीय

धरणगाव येथे भारतीय जनता पार्टीतर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

धरणगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीकडून आर्सनिक अल्बम 30 हे होमिओपॅथी औषधीचे नगरसेवक तथा गटनेते कैलास माळी व उप गटनेते ललित येवले यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक १ व ६ प्रभाग मध्ये वाटप करण्यात आले. आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप प्रसंगी नगरसेवक संगीता गुलाब मराठे, गुलाब मराठे , संजय महाजन, […]

ravi Rana1
क्राईम राजकीय राज्य

संचारबंदीत उड्डाणपूलाचे उद्घाटन ; आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध गुन्हा

अमरावती (वृत्तसंस्था) संचारबंदी लागू असताना शासनाची कुठलीही परवानगी न घेता अमरावती शहरातील राजापेठ येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलाचे उद्घाटन केल्याप्रकरणी बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   राजापेठ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. […]

pm modi
राजकीय राष्ट्रीय

अधिक सावधानता बाळगायला हवी ; पंतप्रधान मोदी

  नवी दिल्ली, वृतसेवा | कोरोनाविरुद्धची लढाई ही देशातील नागरिकांच्या संकल्पनेमुळे लढली जात आहे. नागरिकांच्या संकल्पना शक्तीसोबत देशवासीयांची सेवाशक्तीही या लढाईत महत्त्वाची ठरत असून कोरोना लसीवर देशांत काम सुरु आहे , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संबोधित करताना सांगितले. सोमवार १ जूनपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा संपून अनलॉक-१ सुरू होऊन […]

khadse e1550572684596
आरोग्य राजकीय रावेर

प्रशासनामधील समन्वयाच्या अभावाने कोराना रूग्णांमध्ये वाढ- माजी मंत्री खडसे

रावेर (शालिक महाजन) । प्रशासनाचा एकमेकांमध्ये समन्वय नाही, कोरोना संदर्भात योग्य पाऊल उचलले गेले पाहिजे होते, ते उचलले गेली नाही. परिणामी कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय, अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलतांना सांगितले. प्रयोगशाळा नसल्यामुळे कोरोना अहवाल लवकर मिळत नाही, रिपोर्ट येईपर्यंत कोरोनाबाधित रूग्ण […]