Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चीनलाही मागे टाकण्याची भीती

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतात आतापर्यंत ८२ हजार ८५ रुग्णांची नोंद झालेली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत भारत आता चीनला मागे टाकण्याची भीती आहे. आजच्या दिवसात ८५० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास एकूण कोरोना बाधितांचा आकडा चीनमधील एकूण कोरोनाग्रस्तांपेक्षाही अधिक होईल.

एकाच दिवसात ३ हजार ९९५ रुग्णांची भर
चीनमध्ये आतापर्यंत ८२ हजार ९२९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर भारतात आतापर्यंत ८२,०८५ रुग्ण सापडले आहेत. म्हणजेच दोन्ही देशातील रुग्णसंख्येत केवळ ८४४ चा फरक आहे. भारतात कालच्या दिवसात ३ हजार ९९५ रुग्णांची भर पडली. हा वेग पाहता आजच्या दिवसातच कोरोनाबाधितांचा आकडा चीनला मागे टाकेल. भारतात ५ दिवसांतच रुग्णसंख्या ६० हजारांवरुन ८० हजारांचा टप्पा पार करुन गेली.

 

पुण्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने ‘कोरोना’ संशयिताची आत्महत्या

भारत १२ व्या क्रमांकावर
भारतात काल ३९९५ रुग्णांची भर पडली. सलग सहाव्या दिवशी देशात ३५०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा १२ वा क्रमांक लागतो. भारतात काल ९९ कोरोना रुग्ण दगावले. देशात कोरोनाचे आतापर्यंत २६४६ बळी गेले आहेत. सुदैवाने भारतात २७,६८६ रुग्ण बरेही झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३६.१६ टक्केवर जाणे ही दिलासादायक बाब आहे.

राज्यात लॉकडाऊनची मर्यादा ३१ मे पर्यंत वाढणार

शुभवार्ता : नाशिक विभागातून 407 रूग्ण कोरोनामुक्त !

Exit mobile version