Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चार दुकानांमधून ९ किलो प्लास्किट पिशव्या जप्त

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याने नगरपालिकेने मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अचानक धडक मोहिम राबवून चार दुकानांमधून ९ किलो प्लास्टिक पिशाव्या जप्त केल्या आहे. यावेळी चारही दुकानदारांकडून एकुण ६ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरात प्लास्टिक पिशवींचा मोठा वापर केला जात असल्याची माहिती अमळनेर नगरपालिकेला मिळाली. त्यानुसार पथकाने अचानकपणे मंगळवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता धडक कारवाईला सुरूवात करण्यात आली. यावेळी प्लास्टिक विरोधी पथकाने शहरातील चायनिज बाजार पिरसरातील नानेश ट्रेंडींग, आर.के. पावभाजी व चायनिज, महेंद्र चायनिज व यश चायनीज या दुकानांवर धडक कारवाई केली. यावेळी दुकानांमधून प्लास्टिक पिशव्या, पन्नी आढळून आले. पथकाने एकुण ९ किलो प्लास्टिक जप्त केला असून चारही दुकानदारांनी एकुण ६ हजार ५०० रूपयांचा दंड आकारला आहे. .

ही कारवाई अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी प्लॉस्टिक बंदी करत कारवाई करताना पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे , शहर समन्वयक गणेश गढरी, पथक कर्मचारी गौतम बिऱ्हाडे, योगेश पवार, महेंद्र बि-हाडे समाधान बच्छाव युनूस शेख आदी यांनी कार्यवाही केली.

Exit mobile version