Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बालकवी ठोंबरे स्मारक, साईबाबा मंदिर देवस्थान व क्रांतीकारी ख्याजाजी नाईक स्मृती स्थळासाठी ९ कोटी मंजूर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री झाल्यापासून धरणगाव येथिल बालकवी ठोंबरे  स्मारकासाठी स्थानिक पातळीवर व मंत्रालयात वेळोवेळी बैठका घेऊन स्मारकाचा प्रश्न मार्गी  लावण्यासाठी पाठपुरावा केला होता.  पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौर्याप्रसंगी पाळधी व जळगाव येथील सभेत स्मारकाच्या कामांना गती देण्याचे वचन दिले होते . त्यानुसार  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार  दिलेला शब्द पाळून स्मारकाला  ५ कोटींचा तसेच साईसेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट यांचे पाळधी येथील साईबाबा मंदिरात भक्त निवास व सभागृह बांधकाम करण्यासाठी ०२ कोटी, धरणगाव तालुक्यातील हेडगेवार ग्रामपंचायत येथे क्रांतीकारी ख्याजा नाईक स्मृती स्थळाकडे जाणारा रस्ता क्राॅंक्रीटीकरण व सुशोभीकरण करणे ०२ कोटी असे एकूण ९ कोटीच्या कामांना पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी भरीव निधीस मंजुरी दिल्याने  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे आभार असून भाविक भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत धरणगाव येथील बालकवी बापूजी ठोंबरे यांच्या स्मारकाला पाच कोटी , साईसेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट यांचे पाळधी येथील साईबाबा मंदिरात भक्त निवास व सभागृह बांधकाम करण्यासाठी दोन कोटी, धरणगाव तालुक्यातील हेडगेवार ग्रामपंचायत येथे क्रांतीकारी ख्याजा नाईक स्मृती स्थळाकडे जाणारा रस्ता क्राॅंक्रीटीकरण व सुशोभीकरण करणे दोन कोटी असे एकूण कोटीच्या कामांना पर्यटन विभागाकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली असून २ कोटी ७० लक्ष निधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे. यामुळे धरणगाव , पाळधी  व हेडगेवार नगर  परिसरातील भाविक भक्तांनां मोठा दिलासा मिळाला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले ‘धरणगाव हे बालकवींची जन्मभूमी असल्याचा आणि मी या परिसरातला लोकप्रतिनिधी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.  बालकवींच्या जन्मगावी बालकवी चे  स्मारक व्हावे अशी धरणगावरील साहित्यिक प्रेमी आणि आमची प्रखर इच्छा होती अनेक अडचणी आल्यात मात्र आता ते स्मारक  पूर्णत्वाला येईल याचा आनंद आहे या स्मारकामुळे महाराष्ट्रातील साहित्यिक,  कवी यांचे स्वप्नपूर्ती होऊन बालकवींच्या साहित्याच्या अभ्यासाला देखील वाव मिळणार आहे या स्मारक स्थळी बालकवींच्या  साहित्याचा अभ्यास करता येईल असे ग्रंथालय देखील साकारणार आहोत’

Exit mobile version