Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर मतदार संघात विविध विकासकांसाठी 89 लाखांचा निधी : आ शिरीष चौधरी

shirish chaudhari

अमळनेर (प्रतिनिधी) नागरी व ग्रामिण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी 89 लाख मंजूर झाल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.

सदर कामांसाठी आ.चौधरी यांनी 27 जानेवारी 2019 दिलेल्या पत्रात 3 कोटी 25 लक्ष मागणी केली होती. त्यानुसार पत्रातील 1,2,3,9,13,16,27,28,29,34,36,38,42,52,59,63 नंबरची कामे मंजूर झाली आहेत. यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचीही भेट आ.चौधरी यांनी घेतली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तब्बल 89 लाखांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामिण भागात अनु-जाती वस्त्यांमध्ये उल्लेखनीय विकासकामे होणार आहेत. या मंजुरी बद्दल आ. चौधरीं यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. बडोले व राज्यमंत्री ना कांबळे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

अशी होणार विकासकामे

भोलाने येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, पिंपळकोठा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, दळवेल येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, आबांपिंप्री येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, रत्नापिंप्री येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लाख, सारबेटा खु सभागृह बांधणे 10 लाख,मुडी येथे काँक्रीट गटार व काँक्रीटीकरण रस्ता करणे 9 लाख, मंगरूळ येथे काँक्रीटीकरण रस्ता करणे 10 लाख, मुडी प्र ड येथे काँक्रीटीकरण रस्ता व संरक्षण भिंत बांधणे करणे 8 लाख, जळोद येथे शौचालय बांधणे 8 लाख, भरवस येथे काँक्रीटीकरण रस्ता करणे 3 लाख, लोणपंचम येथे पाणी पुरवठा पाईप लाइन व भूमिगत गटार बांधकाम करणे 6 लाख, दरेगाव येथे संरक्षण भिंत बांधणे 3 लाख, कलाली येथे पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लाख, गोवर्धन येथे भूमिगत काँक्रीट गटार बंधने 5 लाख, आदी विकासकामे होणार आहेत.

Exit mobile version