Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेचे बंद घर फोडून ७६ हजार रुपयांचा लांबविला

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील कोळगाव येथील महिलेचे बंद घर फोडून घरातून ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आज्ञा चोरट्याने चोरून याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल पुंजू केदार (वय-४७, रा.कोळगाव ता. भडगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजे सुमारास त्याचे घर बंद असताना अज्ञात त्यांनी घरात प्रवेश करत ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर अनिल केदार याने भडगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली.  हे चोरी आनंदा प्रकाश खैरे यांनी केली असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Exit mobile version