Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला : ७ जणांचा बळी

हैदराबाद, वृत्तसंस्था ।  देशात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना हैदराबाद येथे ऑक्सिजन टँकर रस्ता  चुकल्याने ७ जणांना नाहक आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात ७ रुग्णांची स्थिती अत्यवस्थ होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला. रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून कमी दाबाने पुरवठा होत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. यासाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टॅकर रस्ता चुकला आणि ७ जणांचा जीव गेला. वाट चुकलेल्या टँकरला रस्ता दाखवण्यासाठी नारयानगुंडा पोलिसांनी प्रयत्नही केले. मात्र टँकर येईपर्यंत उशिर झाला होता. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. टँकरला येण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर का तयार केला नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.

देशभरात कोरोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे आरोग्य सुविधा कोलमडताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे.

 

Exit mobile version