आजही करोना नरमला; जिल्ह्यात दिवसभरात ७ बाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जिल्ह्यात ७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १२ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-२, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०,  यावल-०,  एरंडोल -०,  जामनेर-०, रावेर -०, पारोळा -०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०, बोदवड -० असे एकुण ७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ४५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ६१६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २६४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज १२ तालुका निरंक आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

Protected Content