Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध वाहतूक केले जाणारे ६७ गोऱ्हे पकडले

434372 cowjammu 1

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे काल (दि.१४) पोलिस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका ठिकाणी गोवंशाची अवैध वाहतूक करून त्यांना आणण्यात आल्याचे कळले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वरणगाव पोलिसांनी एकत्रित कारवाई करून एका ट्रकमधून ६७ गोऱ्हे ताब्यात घेतले.

 

या सगळ्या जनावरांना प्राथमिक उपचारांची गरज असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील ‘अहिंसा तीर्थ’ या गो-शाळेत त्यांची रवानगी करण्यात आली. तिथे त्यांची चार-पाण्याची व उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. ६७ पैकी पाच गोऱ्हे मृतावस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी ट्रकचालक व मालक बशीर कुरेशी चढ्ढा आणि शे.वासिम शे. यासीन यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चा सुधारित २०१५ च्या कलम ५ अ,५ ब, ९/११, प्राण्यांना निर्दयतेने वागवणे ११ ड, इ, ब आणि मोटार व्हेईकल कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पाच गोऱ्हे मृत झाल्याने भा.द.वि. ४२९ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघा संशयिताना ताब्यात घेण्यात आले असून ट्रकसह एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Exit mobile version