रावेरकरांना शिस्त लावण्यासाठी प्रांतधिकारी, तहसिलदार उतरले रस्त्यावर

रावेर, प्रतिनिधी । दंगलीच्या चौथ्या दिवशी शिथिल कालावधीत प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, सुमित शिंदे,तहसिलदार उषाराणी देवगुणे, रावेरच्या रस्त्यावर उतरून स्वतः हातात दंडा घेऊन बेशिस्त मोटर सायकल, चारचाकी वाहनधारकांना शिस्त लावतांना दिसून आलेत.

रावेर शहरात चालू असलेली संचारबंदी (कर्फ्यु) आज दि. २५ रोजी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या आदेशावरून शिथिल करण्यात आली. या आदेशात त्यांनी टू व्हीलर,फोर व्हीलर वाहतूक शहरात बंद असतील अशा सक्त सूचना दिल्या होत्या. परंतु, रावेरकरांनी त्यांच्या आदेशाला न जुमानता सर्रास मोटर सायकलवरुन जिवनाश्यक वस्तु घेण्यासाठी गर्दी केली. यावेळी वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी स्वतः प्रांतधिकारी अजित थोरबोले, सुमित शिंदे, तहसिलदार उषाराणी देवगुणे, रस्त्यावर दंडा घेऊन उतरले. त्यांनी रावेरकरांना शिस्तचे धडे दिले. यावेळी तब्बल दोन तास त्यांनी रस्त्यावर थांबुन संपूर्ण बेशिस्त वाहनांना लगाम लावला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माक्स वापरण्याचेही धडे नागरिकांना दिलेत. या त्यांच्या अनोख्या कारवाईने सर्वत्र एकच चर्चा रंगली होती.

दोन तासांच्या शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंद

यावेळी दोन तासाच्या शिथिलतेमध्ये नागरिकांनी जिवनाश्यक वस्तू, भाजीपाला, दूध, मेडीकल, किराणा सामान खरेदी केला. तसेच दुपारी चारनंतर संचारबंदी शहरात पुन्हा लागू करण्यात आली.

Protected Content