Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्रेडीट कार्डचे चार्जेस परत करण्याचे सांगून तरूणाची ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  क्रेडिट कार्डचे लागलेले चार्जेस परत करण्याचे आमिष दाखवत एका रेल्वे विभागात नोकरीला असलेल्या तरूणाच्या क्रेडीटकार्ड खात्यातून ऑनलाइन माध्यमातून तब्बल ६५ हजार ५०९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची खळबळजनक घटना रविवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अखेर शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात २ मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सलमान खान कायमखानी (वय-२९) रा.गजानन महाराज नगर भुसावळ हे आपला परिवारासह वास्तव्याला असून ते रेल्वे विभागात नोकरीला आहे. रविवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता त्यांना अनोळखी दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यात त्यांनी सांगितले की “आम्ही क्रेडिट कार्डच्या बँकेतील कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह म्हणून बोलत असल्याचे सांगत तुमच्या क्रेडिट कार्ड जॉइनिंगचे चार्जेस ९ हजार ९९९ रुपये परत करण्याचे आहे, असे सांगून त्यांनी एक लिंक पाठवली. त्या लिंकचे स्टेप फॉलो करायला सांगितले. त्यानुसार सलमान खान यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून स्टेप फालो करत गेले. त्यावेळी अज्ञात मोबाईल धारकाने ऑनलाइन पद्धतीने २ ट्रान्झेक्शन  करून एकूण ६५ हजार ५०९ रुपये किमतीची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेत चौकशी केली, परंतु त्याबाबत त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन मोबाईल धारकांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन करीत आहे.

Exit mobile version