Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना ओसरतोय : दिवसभरात ६३ बाधित रूग्ण आढळले; १४४ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज दिवसभरात ६३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १४४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. रावेर तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाभरातील आकडेवारी

जळगाव शहर-१, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३, अमळनेर-४, चोपडा-३, पाचोरा-६, भडगाव-०, धरणगाव-१०, यावल-३, एरंडोल-४, जामनेर-३, रावेर-५, पारोळा-४, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-२, बोदवड-३  आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ६३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४१ हजार ७२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३७ हजार ५०५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ६५१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

Exit mobile version