Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा; जळगाव केंद्रातून ‘डहूळ’ प्रथम

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून नाटयभारती, इंदौर या संस्थेच्या ‘डहूळ’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव या संस्थेच्या ‘ब्लडी पेजेस’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

तृतीय पारितोषिक

समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडे या संस्थेच्या ‘महापात्रा’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन :

प्रथम पारितोषिक – श्रीराम जोग (नाटक-डहूळ)
द्वितीय पारितोषिक – वैभव मावळे (नाटक- ब्लडी पेजेस )

प्रकाश योजना

प्रथम पारितोषिक – अभिजित कळमकर (नाटक-डहूळ)
द्वितीय – पारितोषिक उमेश चव्हाण (नाटक- ब्लडी पेजेस)

नेपथ्य

प्रथम पारितोषिक – अनिरुध्द किरकिरे (नाटक- डहूळ)
द्वितीय पारितोषिक – दिनेश माळी (नाटक- ब्लडी पेजेस)

रंगभूषा :

प्रथम पारितोषिक – योगेश लांबोळे (नाटक-महापात्रा)
द्वितीय पारितोषिक – प्रज्ञा बिहाडे (नाटक-ब्लडी पेजेस)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक

दिपक महाजन – (नाटक-ब्लडी पेजेस)
नेहा पवार – (नाटक-महापात्रा)

स्त्री अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे

रुपा अग्रवाल (नाटक-एक चौकोन विस्कटलेला)
पुर्वा जाधव – (नाटक-महापात्रा)
स्वप्ना लिंबेकर भट (नाटक-माणूस नावाचे बेट)
कांचन अराळे (नाटक-बळी)
गायत्री ठाकूर (नाटक-फक्त चहा)

पुरुष अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे

शरद भालेराव (नाटक- दिशा)
चंद्रकांत चौधरी (नाटक- स्टे),
हनुमान सुरवसे (नाटक-सेल मोबाईल आणि…)
अनिल कोष्टी (नाटक-सोडी गेला बाबा)
योगेश शुक्ल (नाटक-वेग्गळं असं काहीतरी)

दि. २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२२ या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून किशोर डाऊ, ईश्वर जगताप आणि मीनाक्षी केंढे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version