Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजस्थानमध्ये 6 वर्षीय चिमुकलीची बलात्कारानंतर हत्या

Rape Child crime

 

टोंक(वृत्तसंस्था) शनिवारपासून बेपत्ता असलेल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना राजस्थानच्या टोंकमध्ये घडली आहे.

शनिवारपासून बेपत्ता झाल्यानंतर रविवारी चिमुकलीचा मृतदेह घरापासून अवघ्या अंतरावर झाडांमध्ये आढळला होता. घटनास्थळावर दारुच्या बाटल्या, कचोरी आणि रक्ताने माखलेले कपडे आढळले. चिमुकलीच्या स्कूल यूनिफॉर्मच्या बेल्टने तिचा गळा आवळण्यात आला आहे. पोलिसांना गावातील व्यक्तीवरच संशय आहे. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

Exit mobile version