Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव लोकसभेसाठी ६.५६ तर रावेरमध्ये ६.०६ टक्के मतदान

VoterTurnout 01

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने लॉन्च केलेले ‘Voter Turnout’ या अॅपवर जिल्ह्यातील दोन्ही संघाची मतदानाची रिअल टाईम आकडेवारी समोर येत आहे. त्यानुसार जळगाव लोकसभेसाठी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत ६.५६ तर रावेरमध्ये ६.०६ टक्के मतदान झालेले आहे.

 

‘Voter Turnout’ या अॅपच्या माध्यमातून देशातील नागरिक राज्यनिहाय आणि मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी तात्काळ पाहू शकणार आहे. याशिवाय नागरिकांना त्यांच्या क्षेत्रातील मतदान केंद्रांसंदर्भातली माहितीसुद्धा या अॅपवर पाहता येतेय. या जळगाव लोकसभेसाठी ६.५६ तर रावेरमध्ये ६.०६ टक्के मतदान झाल्याचे ‘Voter Turnout’ हे अॅपवर दाखवत आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ माहिती देण्याच्या उद्देशाने ‘सुविधा अॅप’च्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघाचा डेटा अपडेट केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात किती मतदान झालं? याची टक्केवारी नागरिकांना या अॅपमध्ये रिअल टाईम  पाहता येत आहे.

Exit mobile version