Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उष्णतेमुळे ५७७ हज यात्रेकरूंचा मृत्यू

रियाध-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सौदी अरेबियातील मक्का येथे हजसाठी आलेल्या 550 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. 12 जून ते 19 जून या कालावधीत चाललेल्या हज यात्रेत आतापर्यंत एकूण 577 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. याचे कारण सौदी अरेबियातील कडक उष्मा असल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्टनुसार, मृतांमध्ये 323 नागरिक इजिप्शियन आहेत, तर 60 जॉर्डनचे आहेत. याशिवाय इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे. 2 अरब राजनयिकांनी एएफपीला सांगितले की बहुतेक मृत्यू उष्णतेमुळे झालेल्या आजारामुळे झाले आहेत. इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की ते सौदी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बेपत्ता शोधण्यासाठी ऑपरेशन करत आहेत. सौदी अरेबियाने सांगितले की, उष्णतेमुळे आजारी पडलेल्या सुमारे 2 हजार यात्रेकरूंवर उपचार केले जात आहेत.

17 जून रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीमध्ये तापमान 51.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मक्कामध्ये हवामान बदलाचा खोलवर परिणाम होत आहे. येथील सरासरी तापमान दर 10 वर्षांनी 0.4 अंश सेल्सिअसने वाढत आहे.

Exit mobile version