Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ३५ वाहनांकडून ५२ लाखांचा दंड वसूल

यावल प्रतिनिधी । गेल्या काही महिन्यांपासून यावल तालुक्यातील बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ३५ वाहनावर कारवाई करत यावल महसूल व पोलीस विभागाने ५२ लाखांचा दंड वसुल केला आहे. 

यावल तालुक्यात मागील काही दिवसापासुन एकीकडे वाळु माफीया हे बेलगाम झाले असुन मागील वर्षीच्या दंडात्मक कार्यवाहीचा तपशीलवार आढावा घेतला असता तत्कालीन अधिकारी यांनी केलेली कार्यवाही लक्ष वेधणारी ठरली आहे. यावलच्या महसुल प्रशासनाने केलेल्या वाळुमाफीया वरील दंडात्मक कार्यवाहीचा आढावा घेतला तर तो अत्यंत समाधानकारक वाटतो. तरी या वर्षात देखील महसुल प्रशासनाकडुन अजुन यापेक्षा चांगली उत्तम कामगीरीची अपेक्षा शासन प्रेमी करीत आहे. यावल तालुक्यात मागील कोरोना संसर्गाच्या महामारीच्या धुमाकुळ घालणाऱ्या वेळी नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लावण्यात आलेली संचारबंदी याच काळात फैजपुर विभागाचे तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ.अजीत थोरबोले, तत्कालीन तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के पवार, तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात वाळु माफीया विरूद्ध सडेतोड कार्यवाहीचा बडगा उद्धगारीत  वाहनावर बेकायद्याशीर विनापरवाना वाळूची वाहतुक काणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली होती.  या कारवाईत अवैध गौण खनिजाची विनापरवाना वाहतुक करणाऱ्या ५ ट्रक, २ डंपर व २८ ट्रॅक्टर अशा एकुण ३५ वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करीत ५२ लाख ३० हजार २३१ रुपये दंडाची रक्कम पैक्की३७ लाख ५९ हजार ७८५ रुपये दंडाच्या रूपात वसुल केले आहे.  यापैकी ८ वाहन न्यायलयात जमा असुन , यातील २५ वाहन सोडण्यात आली आहे. संबधीत तत्कालीन अधिकारी यांनी केलेली धडक मोहीमेव्दारे कार्यवाही ही लक्ष वेधणारी व वाळु माफीयावर प्रशासनाचे वचक बसविणारी आहे .

Exit mobile version