Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर मतदार संघासाठी 50 कोटींच्या निधीला मंजुरी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभागा अंतर्गत, सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागा अंतर्गत रावेर तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून नागरिकांतर्फे आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मुक्ताईनगर मतदार संघाचे दमदार आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन मतदार संघातील विविध विकास कामांना पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळून निधीची मागणी केली होती. त्यानुसार मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत 28 कोटी रुपये, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभागा अंतर्गत 14 कोटी रुपये , सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत रावेर तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी 8 कोटी रूपये असे एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला झाले असून यामुळे मतदार संघातील सुचविण्यात विविध विकास कामे होणार आहेत. यामुळे नागरिकांतर्फे आनंद व्यक्त होत असून एक सक्षम लोकप्रतिनिधी व विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व गुण मतदार संघासाठी लाभदायक असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version