Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावाच्या रस्त्यांसह पुलासाठी पन्नास कोटींचा निधी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व पूलांच्या दुरूस्तीसाठी पन्नास कोटी रूपयांचा निधी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात नुकताच मंजूर झाला असून येत्या वर्षभरात या समस्या मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्युजशी बोलताना दिली आहे.

सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नव्याने स्थापन झालेल्या भाजपा शिवसेना युती सरकारने पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. तालुक्यात गेल्या वर्षी ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे पुलांचे व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते. छोट्या पुलांवरून पाणी जात असल्याने तालुक्यातील एकलहरे गावातील एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली होती. दरम्यान या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्याने या अर्थसंकल्पात चाळीसगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत विविध रस्ते, पूल आदींच्या कामांसाठी ५० कोटी इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे.

यामुळे दळणवळण जलद गतीने होणार असून विकास कामांना गती मिळणार आहे. तत्पूर्वी सदर मंजूर कामांमध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची कामे आदी करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यातील जीवितहानी टळेल. त्यात सध्या भाजपासेना युती सरकार आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षभरात तालुक्यातील मागणी असलेल्या इतर सर्व प्रमुख रस्त्यांना देखील पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ३०५४ ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते व पूल यासाठी निधी आणू. अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या  माध्यमातून चाळीसगाव तालुक्याला पुरवणी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याने आमदार चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले आहे.

 

मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे

 

– शिरसगाव गावातील आरसीसी गटार व रस्ता सुशोभीकरणासाठी- (२.५० कोटी)

– शिरसगाव स्मशानभूमी जवळ तसेच व टाकळी प्रदे शिवाजी विद्यालय जवळ पुलाचे बांधकामासाठी – (२.५० कोटी)

– पाटणादेवी बायपास NH 211 ते चाळीसगाव नगरपलिका हद्द रस्ता कॉक्रीटीकरण करणे – २.५० कोटी

– पाटणागाव ते पाटणादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता व सरंक्षण भिंत – (१.२५ कोटी)

-शिवापूर गावा जवळील पूल व जोड रस्ता सुधारणांसाठी – (२ कोटी)

-ओढरे गावा जवळील पूल व जोड रस्ता सुधारणा – (२.५० कोटी)

– न्हावे चौफुली बोरखेडे बु ते रहिपुरी रस्ता सुधारणा – (२.५० कोटी)

– दसेगाव दडपिंप्री – चिंचखेडे ते देवळी रस्ता सुधारणा – (२.५० कोटी)

– भोरस ते बिलाखेड रस्ता सुधारणा – (२.५० कोटी)

– शिरसगाव ते आडगाव रस्ता सुधारणा – (२.५० कोटी)

-जामदा खेडगाव (खेडगाव गावात कॉक्रीटीकरण) ते जुवार्डी तालुका हद्द रस्ता सुधारणांसाठी – (२.५० कोटी)

– भामरे गावाजवळील नदीवर पूल व जोड रस्ता बांधकाम करणे – (२.५० कोटी)

– डोण दिगर ते हिरापूर रस्ता सुधारणांसाठी – (२.५० कोटी)

– पिंजारपाडे – लोंढे ते खडकीसिम रस्ता सुधारणांसाठी – (२.५० कोटी)

– मेहुणबारे गावात कॉक्रीट रस्ता, गटार ते पोहरे गावाजवळ नदी पात्रात रस्ता कॉक्रीटीकरणासाठी- (२.५० कोटी)

– एकलहरे गावाजवळ पुलांचे जोडरस्त्यासह बांधकामासाठी – (२.५० कोटी)

– कुंझर ते मोरदड रस्ता सुधारणा करणे – (२.५० कोटी)

– पिंप्री प्रदे गावाजवळील नदीवर पुलाचे जोड रस्त्यासह बांधकामांसाठी – (२.५० कोटी)

– बोरखेडे बु गावाजवळ न्हावे रस्त्यावरील पुलाचे जोड रस्त्यासह बांधकामांसाठी  – (२.५० कोटी)

  दडपिंप्री गावाजवळ पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम – (२.५० कोटी)

– दस्तूर फाटा ते तळोदे प्रचा रस्ता व पूल सुधारणांसाठी – (२.२५ कोटी)

Exit mobile version