Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्फोटातील मयतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर

WhatsApp Image 2019 08 31 at 3.34.08 PM

धुळे, प्रतिनिधी | धुळे- शिरपूर वाघाडी येथे झालेल्या केमिकल फॅक्टरीच्या स्फोटातील मयत व्यक्तीच्या वारसांना शासनाने प्रत्येकी ५ लाखांची मदत तसेच जखमींचा सर्व खर्च शासन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

या मदतीची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांनी दिली आहे. सकाळी घटनेची वृत्त कळताच  ना.रावल हे मुंबईहुन शिरपूरकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत. लवकरच ते घटनास्थळी पोहचणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version