Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगाव येथील शेतकऱ्याची ५ लाख २९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लाईफ इंन्शून्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे अमिष दाखवित भडगाव येथील शेतकऱ्याला ५ लाख २९ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील गुढे येथील शेतकरी दीपक पितांबर चौधरी यांना दि. ४ फेब्रुवारी रोजी दीपक कुमार तिवारी व हेमंत सरकार या अनोळखी इसमांचा फोन आला. त्यांनी आपली ओळख लपवून त्यांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन दीपक चौधरी यांना फोन लावून आपण अविवा लाईफ इंन्शूरन्स पॉलीसी कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे अमिष दाखविले. तसेच त्यांना प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता दीपक चौधरी या शेतकऱ्याला वेगवेगळी कारणे सांगून शेतकऱ्याकडून सुमारे ५ लाख २९ हजार ५०८ रुपये स्विकारुन त्यांची ऑनलाईन फसवणुक केली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच दीपक चौधरी या शेतकऱ्याने जळगाव येथील सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित दीपककुमार तिवारी व हेंमंत सरकार यांच्याविरुद्ध सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास पोलीस निरीक्षक बी. डी. जगताप हे करीत आहे.

Exit mobile version