Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात सपा आणि बसपाचे 48 उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार

images 4

मुंबई वृत्तसंस्था- भाजप आणि काँग्रेस यांच्यावर टिकास्त्र सोडत उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहेत, असे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी आणि बसपचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. सत्ताधारी सरकारला सत्तेतून पायउतार काढण्याकरीत समविचारी पक्षाची आघाडी करणे गरजेचे आहे त्यामुळे एकास एक लढत देण्याचा महाराष्ट्रातही प्रयत्न होता मात्र या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी समाजवादी पार्टीला डावलले, असा आरोप अबू आझमी यांनी केला. उत्तर प्रदेश पॅटर्न राज्यात राबविण्यात येणार असून, राज्यात ४८ पैकी किती जागा सप आणि किती जागा बसप लढविणार आहे, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत होईल, असे आ. आझमी यांनी सांगितले.

पैश्यांसाठी हिताचे राजकारण करणारे भाजप आणि काँग्रेस या दोन्ह पक्षांनी दलित, अल्पसंख्याक आणि वंचित समाजघटकांचा विश्वासघात केला असून बसपच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या आदेशानुसार समाजवादी पार्टीसोबत महाराष्ट्रात ४८ जागा लढल्या जातील. ज्याठिकाणी सपची ताकद आहे तेथे सप तर ज्या भागात बसपची ताकद आहे तेथे बसपचा उमेदवार दिला जाईल असे बसपचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, सपचे महासचिव अब्दुल कादीर चौधरी, महापालिकेतील सपचे गटनेते रईस खान यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मायावती, अखिलेश ५ एप्रिल रोजी नागपुरात
केंद्रातील मोदी सरकारचा पाडाव करण्याचा सप आणि बसपचा संकल्प असून, त्यासाठी भाजपला मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात आमच्या युतीच्या प्रचाराची पहिली जाहीर सभा होणार आहे. येत्या ५ एप्रिल रोजी बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती आणि सपचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सभा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

Exit mobile version