Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज ४५ नवीन कोरोना बाधीत

जळगाव प्रतिनिधी । गत काही दिवसानंतर आज तुलनेत कमी म्हणजे ४५ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.

गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाचे रूग्ण वाढीस लागल्याचे दिसून येत होते. या पार्श्‍वभूमिवर, गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात ४५ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ४३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज जळगाव व भुसावळ शहरात अनुक्रमे १४ आणि ११ बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. याशिवाय, अमळनेर व चोपड्यात प्रत्येकी तीन तर धरणगाव, यावल, एरंडोल, रावेर व जळगाव ग्रामीणमध्ये एक रूग्ण आढळून आला आहे. तर, गत २४ तासांमध्ये कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.

 

Exit mobile version