Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अश्लिल व्हिडीओच्या नावाखाली व्यापाऱ्याला ४३ लाखांचा गंडा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून तो डिलिट करण्यासाठी पैसे द्या, अशी धमकी देणाऱ्या दोन जणांनी छत्रपती शिवाजी नगरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून यांच्याकडून ४३ लाख ३ हजार ४९० रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रविवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, व्यापारी असलेले केशव महादेव पोळ (वय-६५, रा. छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) यांना २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पूजा शर्मा, संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज केले. तसेच व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाले असून ते डिलिट करायचे असतील तर पैसे द्या अन्यथा तुमच्या घरी पोलिस पाठवून तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली. यात व्यापारी पोळ हे घबरल्याने त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल ४३ लाख तीन हजार ४९० रुपये खंडणीच्या स्वरुपात वेगवेगळ्या बँक खात्यावर स्वीकारले. एवढी रक्कम देऊनही वारंवार धमकी दिली जात असल्याने केशव पोळ यांनी रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

Exit mobile version