Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकरी घोडकी यांच्या कुटुंबास ४ लाखांचा धनादेश; आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शेतकरी अजय घोडकी यांचा १ ऑक्टोबर रोजी निमखेडी खुर्द येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी सरकारला मदत करण्याची मागणी केली असून आज आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत ४ लाख रुपयांचा धनादेश सरकारकडून कुटुंबाला देण्यात आला आहे.

या घटनेचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याच्या वारसास शासनाकडू दखल घेऊन तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सूचना केल्या होत्या. दरम्यान, या घटनेची आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तात्काळ दखल घेत आज शासनाकडून रुपये ४ लाख रुपयांचा धनादेश आपत्तीग्रस्त कुटूंबियास आ.  पाटील यांनी घरी जाऊन सुपूर्द केला.

प्रसंगी तहसीलदार निकेतन वाढे, मंडळ अधिकारी तायडे, तलाठी अंकिता गवळी, महसूल साहाय्यक गौरव पाटील, संचलाल वाघ, उमेश पाटील, नगरसेवक पियुष मोरे, कैलास डहाके, भास्कर भाऊ, मंगल फरदळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Exit mobile version