Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्य प्रदेशात कार अपघातात 4 हॉकीपटूंचा दुर्दैवी मृत्यू

mp accident

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मध्य प्रदेशच्या होशंगाबाद येथे आज सकाळी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये राष्ट्रीय स्तरावरील 4 हॉकीपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना होशंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग-69 वर घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, होशंगाबाद येथे होणाऱ्या मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी हे सर्व हॉकीपटू जात होते. स्विफ्ट डिझायर कारमधून हे सर्व हॉकीपटू प्रवास करत होते. अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला धडकली. ही धडक एवढी भयानक होती की कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. शाहनवाझ खान, आदर्श हरदुआ, आशिष लाल व अनिकेत अशी मृत खेळाडूंची नावे आहेत. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात राष्ट्रीय स्तरावरील चार उमद्या खेळाडूंचा बळी गेल्यानं राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, अपघाताच्या कार भरधाव वेगात असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version