Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

4 फुट लांबीचा अजगर घरातून पकडला !

 

बुलडाणा :  प्रतिनिधी ।  4 फुट लांबीचा अजगर १५ जून रोजी मोठी देवी परीसरातील गणेश मोरे यांच्या घरात निघाल्याने कुटुंबियांचा थरकाप उडाला.  सर्पमित्र एस बी रसाळ यांनी  या अजगराला  पकडल्याने  उपस्थितांचा जिव भांड्यात पडला

 

येथील मोठी देवी मंदिर समोर जय भोले हॉटेलच्या मागे वनविभागाच्या कार्यालयाजवळ गणेश मोरे यांच्या घरात   4 फुट लांबीचा अजगर आढळल्याने मोरे परिवाराच्या काळजाचा ठोका चुकला. दरम्यान  सर्पमित्र रसाळ यांनी या अजगराला  पकडल्याने उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला  या  अजगराला वनविभागाच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

 

Exit mobile version